गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची धामधूम आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. लोकसभेच्या सर्व ५४३ मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले असून, येत्या गुरुवारी, २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
१९९८ ते २०१४ : एक्झिट पोल किती बरोबर किती चुकीचे ठरले...
वेगवेगळ्या कारणांनी गाजलेली ही निवडणूक अनेकांना आयुष्यभर लक्षात राहिल, अशीच आहे. निवडणुकीत जिंकून परत सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. दुसरीकडे भाजपकडून सत्ता खेचून घेण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पायउतार करण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. काहीही होवो, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होता कामा नयेत, हेच विरोधकांच्या आघाडीचे ध्येय आहे. त्यासाठी विविध विरोधी पक्षांचे नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ लागले आहेत.
निवडणुकीचे चित्र काय राहणार हे स्पष्ट होण्यास आणखी तीन दिवस पाहावी लागणार असली, तरी अंदाजे काय होऊ शकते. हे एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसून येईल. त्यामुळेच एक्झिट पोल कुणाच्या बाजूने आहेत, कोण सत्तेच्या जवळ जायची शक्यता आहे, भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळणार का, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीचा या दोन्ही पक्षांना तिथे होणार का, याचा कानोसा एक्झिट पोलच्या माध्यमातून घेता येईल. अर्थात हे केवळ अंदाज आहेत. खरे चित्र २३ मे रोजी मतमोजणी झाल्यावरच समजेल.
अपडेट्स
- एबीपी नेल्सननुसार पूर्वोत्तर राज्याती २५ पैकी भाजपला १३, काँग्रेसला ६ आणि इतरांना ६ जागा मिळण्याची शक्यता.
- टुडेज चाणक्यनुसार पंजाबमध्ये भाजप ६+३, काँग्रेसला ६+३, आपला १+१ आणि इतर ० जागा मिळण्याचा अंदाज
- इंडिया टीव्हीनुसार दिल्लीमध्ये भाजपला ५२ टक्के मतं मिळण्याचा अंदाज
- एबीपी-नेल्सननुसार हरयाणामध्ये भाजपला १० पैकी १० जागा मिळण्याचा अंदाज
- एबीपी-नेल्सननुसार पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी टीएमसीला २४, भाजपला १६ तर काँग्रेसला २ जागा मिळण्याचा अंदाज
- एबीपी-नेल्सननुसार ओडिशामध्ये भाजपला ८ जागांचा फायदा होऊ शकतो. इथे भाजपला ९, बीजेडीला १२ तर काँग्रेसला ० जागा मिळण्याचा अंदाज
- एबीपी-नेल्सननुसार झारखंडमध्ये १४ पैकी ८ जागा भाजपच्या खात्यात जाण्याचा अंदाज. काँग्रेसला ६ जागा मिळण्याचा अंदाज
- एबीपी-नेल्सनः बिहारमध्ये भाजप-नितीश यांना ४० पैकी ३४ जागा मिळण्याचा अंदाज
- रिपब्लिक टीव्हीनुसार मध्य प्रदेशात एनडीएला २४ तर यूपीएला ५ जागा
- टुडेज चाणक्यनुसार दिल्लीत भाजपाला ६ ते ७ तर काँग्रेसला १ जागा मिळण्याचा अंदाज
- रिपब्लिक टीव्हीनुसार तामिळनाडूत एनडीए ११, यूपीए २७ तर इतरांना ० जागा मिळण्याची शक्यता
- इंडिया टीव्ही-सीएनएक्सः तेलंगणात केसीआर चंद्रशेखर राव यांचा पक्ष टीआरएस आघाडीवर. टीआरएस १४, काँग्रेस २ आणि एमआयएम १ जागा मिळण्याचा अंदाज
- इंडिया टुडे-अॅक्सिसः कर्नाटकात भाजप २१-२५ जागा जिंकण्याचा अंदाज, काँग्रेसला ३-६ मिळण्याचा अंदाज
- टाइम्स नाऊ-व्हीएमआरनुसार यूपीत भाजप ४३, काँग्रेस २ तर इतरांना ३५ जागा मिळण्याचा अंदाज
-इंडिया टुडे-अॅक्सिसः गोव्यात भाजपला २ तर काँग्रेसला ० जागा मिळण्याचा अंदाज
- इंडिया टुडे-अॅक्सिसः गुजरातमध्ये भाजपला २५-२६ जागा, काँग्रेसला शून्य जागा मिळण्याचा अंदाज
- एबीपी-नेल्सनः भाजप आणि घटक पक्ष २६७, काँग्रेस आणि घटक पक्ष १२७, सपा आणि बसपा ५६, इतर ८४ जागा
- आजतक नुसार राजस्थानमध्ये २३-२५ जागांवर भाजपच्या विजयाची शक्यता. काँग्रेसला ०-२ जागा मिळण्याचा अंदाज
- एबीपी न्यूज-नेल्सनच्या सर्व्हेनुसार यूपीत महाआघाडीला मोठा फायदा होण्याचा अंदाज. भाजपला धक्का बसण्याचा अंदाज
- Republic - Jan Ki Baat रिपब्लिक-जन की बात- भाजप आणि घटक पक्षांना ३०५, काँग्रेस आणि सहकारी पक्षांना १२४ आणि इतरांना ११३ जागा मिळण्याचा अंदाज
- रिपब्लिक टीव्ही- सी-व्होटरनुसार भाजप आणि घटक पक्षांना २८७, काँग्रेस आणि सहकारी पक्षांना १२८ तर इतरांना १२७ जागा मिळण्याचा अंदाज
- टाइम्स नाऊः काँग्रेस आणि सहकारी पक्षांना १३२ जागा मिळण्याचा अंदाज आणि इतरांना १०४ जागा मिळण्याचा अंदाज
- टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये भाजप आणि घटक पक्षांना ३०६ जागा मिळण्याचा अंदाज
- यूपीः बसपा ३०, सपाला २४ जागा, काँगेसला २ जागा मिळण्याचा अंदाज
- नेल्सनच्या सर्व्हेत यूपीत भाजप+एनडीएला अवघ्या २२ जागा
- एक्झिट पोलपूर्वी राहुल गांधींचे टि्वट
From Electoral Bonds & EVMs to manipulating the election schedule, NaMo TV, “Modi’s Army” & now the drama in Kedarnath; the Election Commission’s capitulation before Mr Modi & his gang is obvious to all Indians.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 19, 2019
The EC used to be feared & respected. Not anymore.
- पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना
- सातव्या टप्प्यातील मतदान संपुष्टात
सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यावर साडेसहा वाजता एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात होईल