पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधकांना EVM ची चिंता, २२ पक्षांनी EC ला दिल्या दोन आयडिया

विरोधकांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली

विरोधकांच्या २२ पक्षांनी मिळून मंगळवारी निवडणूक आयोगाची भेट घेत मतमोजणी संदर्भातील आपल्या मागण्या निवडणूक आयोगासमोर मांडल्या. तसेच गुरुवारी २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी विरोधकांनी दोन सूचना निवडणूक आयोगाला दिल्या असून मतमोजणीपूर्वी या सूचनांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 

निवडणूक आयोगाने जवळपास एक तास विरोधकांचे शंका ऐकून घेतल्या. यासंदर्भात निवडणूक आयोगाने विरोधकांना काही ठोस आश्वासन दिले नसले तरी बुधवारी निवडणूक आयोगाचे तीन सदस्य संबंधीत विषयावर बुधवारी चर्चा करतील, असे आश्वासन निवडणूक आयोगाकडून विरोधकांना देण्यात आले आहे. एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिला होता की, मतदार क्षेत्रातील पाच केंद्राची  निवड करुन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रा आणि व्हीव्हीपॅटमधील यांच्यातील मते जुळतात का हे तपासून पाहावे.

EVM आणि VVPAT यातील मते जुळली नाही तर काय?, विरोधकांचा निवडणूक आयोगाला सवाल

मोजणीच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे ट्रॅकिंग करावे आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची अधिकाधिक मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली आहे. जर एखाद्या मतदारसंघातील एकाही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते जुळली नाहीत. तर त्या मतदारसंघातील सर्वच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जावी. त्यामुळे लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी मदत होईल , असे विरोधकांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेता अभिषक मनु सिंघवी म्हणाले, यामध्ये अशक्य असे काहीच नाही. सर्वोच्च न्यायालयाने नमुना म्हणून पाच मतदार केंद्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते जुळतात का? हे पाहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये घोळ दिसला तर ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.