पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डाव्यांची मते भाजपकडे वळण्याची शक्यता, तृणमूल काँग्रेसचा अंतर्गत सर्व्हे

तृणमूल काँग्रेस

पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डाव्यांची मते भाजपकडे वळण्याची शक्यता असल्याचे तृणमूल काँग्रेसने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात दिसून आले आहे. असे घडल्यास त्याचा फटका तृणमूल काँग्रेसलाच बसणार आहे. त्यासाठीच या संभाव्य दगाफटक्यापासून वाचण्यासाठी यावेळी तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये आक्रमक रुप धारण केले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांना ३० टक्के मते मिळाली होती. यातील काही टक्केवारी जरी भाजपकडे वळली तरी त्याचा भाजपला फायदाच होणार आहे. 

त्याच जागेवर विद्यासागर यांचा पुतळा उभारणार, मोदींची ग्वाही

नाव न छापण्याच्या अटीवर तृणमूल काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्यांने सांगितले की, आम्हाला पश्चिम बंगालमध्ये ३० च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज आहे. पण डाव्यांच्या गेल्या वेळेच्या ३० टक्के मतांपैकी १० टक्के मते जरी भाजपकडे वळली, तरी त्याचा फटका आम्हाला बसू शकतो. आमच्या जागा २५ पेक्षा खाली जाऊ शकतात. पश्चिम बंगालमधील १५ जागा अशा आहेत की तिथे अल्पसंख्य समाजातील मतदारांची संख्या कमी आहे. तिथे भाजपची स्थिती सध्या मजबूत असल्याचे दिसते आहे. त्यामुळेही तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सध्या चिंतेत आहेत. जर डाव्यांची मते भाजपकडे वळली, तर पश्चिम बंगालमधील मध्यमवर्गीयांवरील भाजपची पकड आणखी घट्ट होईल. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील ४२ जागांपैकी ३४ जागा तृणमूल काँग्रेसला मिळाल्या होत्या. तर केवळ २ जागांवर भाजपला विजय मिळाला होता. त्यावेळच्या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी १६ इतकी होती. पश्चिम बंगालमधील हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा इरादा आहे. त्यासाठी त्यांचा राज्यातील ९ जागांवर सर्वात जास्त लक्ष आहे. ज्या ठिकाणी हिंदी भाषिक आणि भाजप समर्थकांची संख्या जास्त आहे. दुसरीकडे डावे पक्ष निवडणुकीत आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठीच लढत आहेत. त्यांच्या दृष्टीने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसपेक्षा भाजप परवडला. कारण तृणमूल काँग्रेसनेच त्यांना सत्तेतून पायउतार केले होते. 

पंतप्रधानपद नाही मिळाले तरी चालेल पण मोदी नकोः काँग्रेस

'हिंदूस्थान टाइम्स'ला दिलेल्या एका मुलाखतीत आसाममधील मंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले होते, सारासार विचार करणारे मतदार मग ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे असू दे, काँग्रेसचे असू दे किंवा अगदी तृणमूल काँग्रेसचे असू दे ते सगळे यावेळी भाजपला मत देत आहेत. हे सगळे मोदींना बघूनच भाजपला मत देत आहेत.