पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'राहुल गांधी एवढे अहंकारी असतील वाटले नव्हते'

 केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

राहुल गांधी आपल्या मतदार संघात आजही फिरकले नसल्याचे सांगत स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे. आज मतदानाच्या दिवशीही राहुल गांधींनी अमेठीच्या जनेला धोका दिला. ते इतके अहंकाही असतील, असे वाटले नव्हते. जनतेचा एवढा अपमान करण्याची गरज काय? असा सवाल स्मृती इराणी यांनी राहुल गांधीना केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आज देशातील पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. या टप्प्यात अमेठीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात लढत होत आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीशिवाय केरळमधील वायनाडमधूनही निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या या निर्णयावर देखील स्मृती इराणी यांनी टीका केली होती. १५ वर्षे खासदार असूनही राहुल गांधी यांनी अमेठीच्या विकासासाठी काहीही केले नाही. ते आता वायनडमधून निवडणूक लढवत आहेत. हा अमेठीच्या लोकांचा अपमान आहे. तो सहन केला जाणार नाही. अशा शब्दात स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. 

उत्तर प्रदेशातील अमेठी हा राहुल गांधी यांचा पारंपरिक मतदार संघ आहे.  २०१४ मध्ये देखील स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिले होते. मागील लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांना राहुल गांधी यांच्याविरोधात पराभव स्वीकारावा लागला होता. 

प्रियांका गांधी नवऱ्याच्या नावापेक्षा माझे नावे जास्त घेतात, स्मृती इराणी