पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Loksabha Election 2019 : सातव्या टप्प्यातील मतदान समाप्त, ६० टक्के मतदान

भाजप उमेदवार निलांजन रॉय यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान रविवारी संध्याकाळी सहा वाजता संपले. यासोबत देशातील ५४३ मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. येत्या गुरुवारी २३ मे रोजी मतमोजणी होईल. सातव्या टप्प्यासाठी रविवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. एकूण सात राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ५९ जागांसाठी मतदान झाले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवित असलेल्या वाराणसी मतदारसंघात आजच मतदान झाले. दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी या मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. पश्चिम बंगालमधील हिंसाचार हेच सातव्या टप्प्यातील मतदानाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

कुठे किती जागांवर मतदान
उत्तर प्रदेश - १३
पंजाब - १३
पश्चिम बंगाल - ९
बिहार - ८
मध्यप्रदेश - ८
हिमाचल प्रदेश - ४
झारखंड - ३
चंडीगढ़ - १
एकूण - ५९

आकडे काय सांगतात?

एकूण १० कोटी मतदार या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावणार

एकूण ९१८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

१.०२ मतदान केंद्रांवर होणार मतदान

अपडेट्स

सहा वाजेपर्यंत मतदान (टक्केवारी)

बिहार - ४९.९२
हिमाचल प्रदेश - ६६.१८
मध्य प्रदेश - ६९.३८
पंजाब - ५८.८१
उत्तर प्रदेश - ५४.३७
पश्चिम बंगाल - ७३.०५
झारखंड - ७०.०५
चंदीगढ - ६३.५७
एकूण - ६०.२१

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान (टक्केवारी)

बिहार - ४६.७५
हिमाचल प्रदेश - ५७.४३
मध्य प्रदेश - ५९.७५
पंजाब - ५०.४९
उत्तर प्रदेश - ४७.२१
पश्चिम बंगाल - ६४.८७
झारखंड - ६६.६४
चंदीगढ - ५१.१८
एकूण - ५३.०३

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकातामध्ये केले मतदान

माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याने कोलकातामध्ये केले मतदान

दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान (टक्केवारी)

बिहार - ४६.६६
हिमाचल प्रदेश - ४९.४३
मध्य प्रदेश - ५७.२७
पंजाब - ४८.१८
उत्तर प्रदेश - ४६.०७
पश्चिम बंगाल - ६३.५८
झारखंड - ६४.८१
चंदीगढ - ५०.२४
एकूण - ५१.९५

बिहारमध्ये अराह मतदान केंद्रावर बोगस मतदान थांबविण्यास गेलेल्या पोलिसांवर हल्ला

दुपारी दोन वाजेपर्यंत सरासरी ४१ टक्के मतदान

दुपारी एक वाजेपर्यंत मतदान (टक्केवारी)

बिहार - ३६.२०
हिमाचल प्रदेश - ३४.४७
मध्य प्रदेश - ४३.८९
पंजाब - ३६.६६
उत्तर प्रदेश - ३६.३७
पश्चिम बंगाल - ४७.५५
झारखंड - ५२.८९
चंदीगढ - ३५.६०
एकूण - ३९.८५

तेजप्रताप यादव यांच्या अंगरक्षकाची दादागिरी, पत्रकाराला मारहाण

पं. बंगालमध्ये भाजपचे उमेदवार निलांजन रॉय यांच्या गाडीची तोडफोड

पंजाबमध्ये शांततापूर्ण वातावरणात मतदान - मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग

अभिनेते आणि पाटणा साहिबमधील काँग्रेस उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी केले मतदान

सकाळी ११ वाजेपर्यंत १७ टक्के मतदान

पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सपत्नीक अमृतसरमध्ये केले मतदान

सकाळी दहा वाजेपर्यंत ११.५९ टक्के मतदान

लोकसभेच्या अध्यक्ष आणि भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी इंदौरमध्ये केले मतदान

भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि पक्षाचे नेते प्रेमकुमार धुमाल यांनी हिमाचल प्रदेशमध्ये केले मतदान

पश्चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातील काही ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी दाखल, मतदारांना मतदानापासून रोखल्याचा भाजपचा आरोप

सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान (टक्केवारी)

बिहार - १०.६५
हिमाचल प्रदेश - ०.८७
मध्य प्रदेश - ७.१६
पंजाब - ४.६४
उत्तर प्रदेश - ५.९७
पश्चिम बंगाल - १०.५४
झारखंड - १३.१९
चंदीगढ - १०.४०

तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना धमक्या. बूथवर बसला तर मारून टाकू, भाजपचे उमेदवार सी. के. बोस यांचा आरोप

हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचे मंडीमध्ये मतदान

भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी इंदौरमध्ये बजावला मतदानाचा अधिकार

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पाटण्यामध्ये केले मतदान

क्रिकेटपटू हरभजनसिंग याने जालंधरमधील गढी गावात केले मतदान

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी पाटणामध्ये केले मतदान

लोकसभा निवडणुकीचा कालावधी कमी करावा. दोन टप्प्यांमध्ये जास्त अंतर नको - नितीशकुमार यांची मागणी

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बजावला मतदानाचा अधिकार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok sabha election 2019 seventh and last phase voting on 59 seats in 8 state live coverage seat by seat live streaming