पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये लालूंच्या पक्षाची अवस्था बिकट, सगळेच उमेदवार हारले

तेजस्वी यादव

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे बिहारमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय जनता दलाला तिथे दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला एकही जागा मिळाली नाही. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या मुलांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढविली गेली. पण वडिलांप्रमाणे कामगिरी करण्यात या निवडणुकीत तरी त्यांना अपयश आले आहे.

भाजपच्या विजयावर राज ठाकरे म्हणाले, 'अनाकलनीय' !

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाने काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या आघाडीमध्ये निवडणूक लढविली होती. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने ही निवडणूक लढविली. पण पक्षाने लढविलेल्या २० जागांपैकी एकाही जागेवर निवडणूक जिंकता आली नाही. २०१४ मधील निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने ४ जागांवर यश मिळवले होते. पण यावेळी त्याही जागा पक्षाला गमवाव्या लागल्या आहेत. 

१९९७ मध्ये बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाची स्थापना लालूप्रसाद यादव यांनी केली. २००८ मध्ये या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने १७ जागांवर यश मिळवले होते.

NDA, UPA सह अन्य पक्षांचा ताळेबंद!

एकीकडे राष्ट्रीय जनता दलाची ही अवस्था असताना दुसरीकडे काँग्रेसला या राज्यात केवळ एकाच जागेवर यश मिळाले आहे. काँग्रेसने नऊ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एकाच ठिकाणी पक्षाला विजय मिळवता आला.