यंदा लोकसभा निवडणुकीचे निकालाच्याऔपचारिकतेसाठी उशीर होणार असला तरी दुपारी १२ पर्यंत सत्तेची समीकरणे काय असतील हे जवळपास स्पष्ट होईल. मतमोजणीला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होणार असून सर्वप्रथम पोस्टाद्वारे आलेल्या मतांची मोजणी करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजल्यापासून इव्हीएम मशीनमधील मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासांमध्ये म्हणजे ९ पासून पहिल्या फेरीतील ट्रेंड समजू शकेल.
'NDA-UPA यांच्यात ७८ जागेवर अटीतटीच्या लढती होतील'
मतमोजणीनंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील ५ इव्हीएम मशीन मधील मते आणि व्हीव्हीपॅटमधून निघालेली चिठ्ठी यात काही तफावत येते का याची चाचपणी करण्यात येईल. त्यानंतर विजयी उमेदवाराचे नाव समोर येईल. या प्रक्रियेमुळे अधिकृत नाव घोषित करण्यासाठी विलंब होणार आहे. विरोधी पक्षांनी मतमोजणीपूर्वी इव्हीएममधील मते आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठी यांच्यातील जुळणी करावी, अशी मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने ती फेटाळली होती.
भाजपसाठी EVM म्हणजे 'इलेक्ट्रॉनिक व्हिक्ट्री मशीन': काँग्रेस