पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हेरी गुड! PM मोदींच्या पत्रकार परिषदेवर राहुल गांधीची प्रतिक्रिया

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) पाच वर्षात पहिल्यांदाच पत्रकार परिषदेत हजेरी लावली. दिल्लीतील भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत अध्यक्ष अमित शहा यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आहेत. यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की,  'व्हेरी गुड, पंतप्रधानांनी पहिली पत्रकार परिषद निवडणुकीच्या निकालासाठी चार-पाच दिवस बाकी असताना घेतली. पंतप्रधान भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत पत्रकार परिषदेत आहेत. दरवाजा बंद करुन अनोख्या पद्धतीने ही पत्रकार परिषद सुरु आहे. मला सुरजेवाल यांनी सांगितले की, कार्यालयाचे दरवाजे बंद करुन ही पत्रकार परिषद सुरु आहे. काही पत्रकारांना प्रवेश नाकरण्यातही आला आहे. 

राहुल म्हणाले की,  पंतप्रधान नरेंद्र मोदींना मी अनेकवेळा चर्चेसाठी बोलवले. ते आले नाहीत. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी पत्रकार परिषदेला हजेरी लावली. हे एक चांगले पाऊल आहे. आता मी त्यांना आव्हान करतो की, त्यांनी पत्रकार परिषदेत मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. मोदींनी राफेलवर बोलावे, अनिल अंबानींबाबत मौन सोडावे. यावेळी त्यांनी मोदी यांनी रडारसंदर्भात केलेल्या वक्तव्याची देखील खिल्ली उडवली. ते पुढे म्हणाले, मोदींचे विचारसरणी ही महात्मा गांधीजींची नाही तर हिंसक अशी आहे. २३ मे रोजी जनता याचा कौल देईल.. यावर मी आताच काही बोलत नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Lok Sabha Election 2019 Rahul mocks PM for attending first PC with Amit Shah days before polling ends