पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : प्रियांका गांधी

प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात रविवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी भाजप सरकार सत्तेतून जात असल्याचे सांगितले. लोकांमध्ये आक्रोश असून ते त्रस्त आहेत. त्यामुळे ते आपल्या भावना मतदान यंत्रातून व्यक्त करणार आहेत, असे सांगितले.

देशातील लोकशाही वाचविण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक असल्याचे सांगून प्रियांका गांधी म्हणाल्या, निवडणुकीचे निकाल नक्कीच चांगले येतील, अशी मला आशा आहे. आम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत नाहीत, असे सांगत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.

... म्हणून सहाव्या टप्प्यातील मतदान भाजपसाठी कडवे आव्हान

दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडी झाली नाही. त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो का, असे विचारल्यावर त्यांनी मला असे वाटत नाही. याचा भाजपला काही फायदा होणार नाही, असे उत्तर दिले.  

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात रविवारी सात राज्यांतील ५९ जागांसाठी मतदान होते आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, दिल्ली आणि हरियाणामध्ये आज मतदान होते आहे.