पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीव्हीवर झळकणे ही राजकीय ताकद नसते, प्रियांका गांधींचा मोदींना टोला

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी

दिल्लीच्या मैदानातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील प्रचार सभेत त्यांनी मोदींच्या भावनिक राजकारणावर तोफ डागली आहे. भारताच्या इतिहासात मी त्यांच्या इतका कमकुवत पंतप्रधान पाहिलेला  नाही. प्रचार सभेत मोठ्या मोठ्या गोष्टी करत टिव्हीवर झळकणे ही राजकीय ताकद नसते, अशा शब्दांत त्यांनी मोदींवर निशाणा साधला. 

जनतेला प्राधान्य देणे हिच खरी राजकीय ताकद असते. राजकारणी व्यक्तीमत्वाने लोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवणे अपेक्षित असते. त्याला विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. पंतप्रधान मोदी जनतेच्या समस्या ऐकून घेत नाहीत. शिवाय ते त्यांच्या प्रश्नांचीही उत्तरे देत नाहीत. त्यांच्या सारखा कमकुवत पंतप्रधान मी यापूर्वी पाहिलेला नाही, असे प्रियांका गांधी म्हणाल्या आहेत.  

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या दोन टप्प्यातील प्रचाराचा वेग वाढला आहे. यापूर्वी दिल्लीच्या मैदानातून प्रियांका गांधी यांनी पंतप्रधानांना आव्हान दिले होते. अखेरच्या दोन टप्प्यांत मोदींनी नोटाबंदी आणि जीएसटी मुद्यावर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान प्रियांकांनी मोदींना दिले होते.  

Exclusive: आता अपमान सहज पचवतो- पंतप्रधान मोदी