पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प. बंगाल: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुदतीपूर्वीच प्रचार बंदी

पश्चिम बंगालमध्ये मुदतीपूर्वी प्रचार बंदीचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात देशभरात प्रचाराचा जोर वाढला असताना पश्चिम बंगालमध्ये प्रचार सभांच्या तोफा या मुदतीच्या एक दिवस अगोदरच थंडावणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये १९ मे रोजी होणाऱ्या मतदानासाठीच्या प्रचारावर गुरुवारी रात्री १० पासूनच बंदी घालण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार,  पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या दमदम, बरसात, बसीरहाट, जयनगर, मथुरापुर, जादवपुर, डायमंड हार्बर, दक्षिण आणि उत्तर कोलकाता या जागांवरील प्रचाराला गुरूवारी रात्री १० पासूनच बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने कलम ३२४ च्या आधारावर प्रचाराच्या मुदतीच्या एक दिवस अगोदरच प्रचारावर बंदी करण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. हिंसाचारामुळे राज्यात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती  निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार यांनी दिली. 

ममता बॅनर्जींची वर्तणूक सद्दाम हुसेनसारखीः विवेक ओबेरॉय
 

मंगळवारी सायंकाळी कोलकातामधील ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचे नुकसान करण्यात आले होते. या घटनेबद्दल आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्य सरकार संबंधित घटनेतील दोषींवर योग्य कारवाई करेल, अशी आशा देखील आयोगाने व्यक्त केली. 
लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यात एकूण ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये हिंसेच्या घटना वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.