पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प. बंगालचे ४० आमदार माझ्या संपर्कात - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

ममता बॅनर्जी यांनी लोकांचा विश्वासघात केला आहे आणि याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल. पश्चिम बंगालमधील तरुण याचा बदला नक्कीच घेईल, असे स्पष्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूळ काँग्रेसचे ४० आमदार माझ्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. २३ मे रोजी मतदानाचा निकाल लागेल, त्यावेळी तुमचे आमदार तुम्हाला सोडून पळतील, अशी टीका त्यांनी केली.

पश्चिम बंगालमधील सेरमपूरमध्ये एका प्रचारसभेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, दीदी तुमचे गुंड राज्यातील निर्दोष नागरिकांना जी दगडे मारताहेत. ती तुम्ही रसगुल्ल्यांसोबत माझ्याकडे पाठवा. जेणेकरून येथील सामान्य माणसांची डोकी तरी फुटणार नाहीत. 

ममता बॅनर्जी यांच्या मनात काही वेगळ्याच योजना आहेत. दिल्ली तर एक कारण आहे. खरंतर त्यांना येथे आपल्या भाच्याला बसवायचे आहे. तुमच्या दोघांमधील हा खेळ पश्चिम बंगालच्या जनतेने ओळखला आहे. चिटफंड घोटाळ्यात ज्यांना आपल्या जवळच्या लोकांना गमवावे लागले. त्यांच्या अश्रूंची किंमत राज्यातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी खरमरीत टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

महाआघाडीतील विरोधकांना देशात पूर्ण बहुमतातील सरकार नको आहे. त्यामुळे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांनी अधिक जागरुकरणे आपला हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन झारखंडमधील सभेत त्यांनी केले.