पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ममतांनी व्यक्त केला संताप

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये मुदतीपूर्वी म्हणजे एक दिवस अगोदर केलेली प्रचार बंदी आणि राज्याच्या गृह सचिवांना हटवण्याच्या निर्णय अनैतिक आणि चुकीचा असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. 

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या होणाऱ्या दोन सभांना वेळ दिला आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या आदेशावर काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये घडलेली घटना ही अमित शहा यांच्या उपस्थित झाली. पण तरीही निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली नाही, असा उल्लेख करत त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर टीका केली. 

प. बंगाल: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुदतीपूर्वीच प्रचार बंदी
 

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, अमित शहा यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला धमकावले. त्यामुळेच आयोगाने हा निर्णय घेतला का? बंगाल घाबरलेला नाही. पण मी मोदींच्या विरोधात बोलत आहे त्यामुळे बंगालला लक्ष्य करण्यात येत आहे. मंगळवारी झालेल्या हिंसारात बाहेरुन लोक आले होते, असेही त्या म्हणाल्या आहेत. 

रोड शो दरम्यानच्या हिंसाचारात TMC च्या गुंडांचा हात : अमित शहा
 

प्रचाराला गुरूवारी रात्री  १० पासूनच बंदी घालण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने कलम ३२४ च्या आधारावर मुदतपूर्व प्रचार बंदी करण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. हिंसाचारामुळे राज्यात निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी आयोगाने हा निर्णय घेतल्याची माहिती  निवडणूक उपायुक्त चंद्र भूषण कुमार यांनी दिली.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: lok sabha election 2019 mamata reacts on ec decision says it is unethical and political based