पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जनता अत्याचारी सरकार उलथून लावेल, मोदींचा ममतांवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालच्या मूळावर उठले असून राज्यातील जागृक नागरिक अत्याचारी सरकार उलटून लावतील, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या ताकी येथील प्रचार सभेत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर  तोफ डागली. संपूर्ण देशाने टिव्हीच्या माध्यमातून तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान हिंसाचार केल्याचे पाहिले आहे. या घटनेनंतर संपूर्ण देश पश्चिम बंगालच्या निकालासाठी उत्सुक आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.  

प. बंगाल: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच मुदतीपूर्वीच प्रचार बंदी

तृणमूल काँग्रेस भाजपचा बदला घेईल, या ममतांच्या वक्तव्यावर जोर देत मोदी म्हणाले की, ''दीदी (ममता बॅनर्जी) यांचे गुंड बंदूका आणि बॉम्ब हातात घेऊन राज्याला नष्ट करायला निघाले आहेत. हे सरकार राज्यातील सर्व काही नष्ट करु पाहत आहे. जनतेचा दृढ विश्वास आणि साहस या अत्याचारी सरकारला जागा दाखवून देईल, अशा शब्दात त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. 

रोड शो दरम्यानच्या हिंसाचारात TMC च्या गुंडांचा हात : अमित शहा

मोदी पुढे म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे दीदी (ममता बॅनर्जी) घाबरल्या आहेत. राज्यातील जनतेने त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करुन सन्मान दिला. पण सत्ता मिळाल्यानंतर त्या आता लोकशाहीचा गळा आवळत आहेत, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election 2019 mamata banerjee govt out to destroy everything in west bengal says narendra modi