पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आघाडी सरकार नको, खंबीर नेतृत्त्व हवे हाच लोकांचा कल - जेटली

नरेंद्र मोदी

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमधून नक्की काय दिसतंय, याचे विश्लेषण केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की एक्झिट पोलच्या अंदाजांवरून भारतीय लोकशाही अधिक परिपक्व होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर लोकांचा आता आघाडी सरकारवर विश्वास उरलेला नाही. यावरून राजकीय विश्लेषक जरी गोंधळलेले असले, तरी देशातील जनता अजिबात गोंधळलेली नाही. त्यांना नक्की काय हवंय, हे त्यांनी निवडलं आहे, असे जेटली यांनी म्हटले आहे.

प्रायश्चित घेण्यासाठी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे मौनव्रत

ते म्हणतात, त्रिशंकू लोकसभा अस्तित्त्वात येऊ नये, असे देशातील लोकांना वाटते. त्यामुळे आघाडी सरकार नको, खंबीर नेतृत्त्व हवे, असाच त्यांचा कल आहे. त्याचबरोबर जातीच्या समीकरणांपेक्षा राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाचे, राष्ट्रीय सुरक्षेचे विषय नागरिकांना जास्त उपयुक्त वाटतात. गेल्या लोकसभा निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली होती. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही नरेंद्र मोदींवर पुन्हा वैयक्तिक टीका करण्यात आली. पण लोक त्याचा फारसा विचार करणार नाहीत. नेत्याची निवड ही त्याच्या गुणवत्तेवरच केली जाईल. तो कोणत्या जातीतून किंवा कुटुंबातून आला आहे, हे बघितले जाणार नाही, असे जेटली यांनी म्हटले आहे.

'आता पुढची तयारी', अखिलेश-मायावती यांच्यात तासभर चर्चा

सगळेच एक्झिट पोल साधारणपणे एकसारखेच अंदाज व्यक्त करीत आहेत. त्यामुळे निकाल काय लागतील, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. जर एक्झिट पोलचे निकाल आणि २३ मे रोजी लागणारे खरेखुरे निकाल एकच आले तर विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणारा ईव्हीएममधील फेरफाराचा मुद्दाही धुळीस मिळेल, असे अरूण जेटली यांनी म्हटले आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election 2019 exit polls In Arun Jaitleys analysis of exit polls 6 messages from voters to politicians