पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक्झिट पोल बनावट, निराश होऊ नका; राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

गेल्या रविवारी जाहीर झालेले एक्झिट पोलचे अंदाज बनावट आहेत. अपप्रचारामुळे निराश होऊ नका, असा संदेश काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्याचवेळी त्यांनी पुढचे २४ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे, असेही म्हटले आहे. ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केले.

लोकसभा निवडणुकीचे सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर गेल्या रविवारी वेगवेगळे एक्झिट पोल जाहीर झाले. या सगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सत्तेच्या जवळ जाईल, असे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. एनडीएला २७७ ते ३४० या दरम्यान जागा मिळतील, असे सगळ्या एक्झिट पोलनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या जागा वाढतील. पण त्या एनडीएपेक्षा कमीच असतील, असे निष्कर्ष एक्झिट पोलनी काढले आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून कार्यकर्त्यांना एक्झिट पोल अपप्रचार करणारे असून ते बनावट आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका, असे म्हटले आहे.

येते २४ तास खूप महत्त्वाचे आहेत. घाबरू नका. सतर्क राहा. तुम्ही सत्यासाठी लढता आहात. स्वतःवर आणि काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवा. तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.