पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Lok Sabha Election 2019 Exit Poll : '२०१४ मध्ये उत्तर प्रदेशात जे झाले ते आता बंगालमध्ये होईल'

राम माधव

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला जो पाठिंबा मिळाला, तो यावेळी पश्चिम बंगालमध्ये मिळेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केला. बंगालमधील निकालांमुळे सर्व राजकीय विश्लेषकांना आश्चर्याचा धक्का बसेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

एक्झिट पोलचे अंदाज चुकीचेही ठरलेत, पाहा भूतकाळात काय घडलं

लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान रविवारी संध्याकाळी संपले. यानंतर जाहीर करण्यात आलेल्या विविध एक्झिट पोल्सनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जागा वाढणार असल्याचा अंदाज सर्वच संस्थांनी व्यक्त केला आहे. भाजपला या निवडणुकीत दोन आकडी जागा मिळतील, असे सगळ्याच एक्झिट पोलनी म्हटले आहे. त्यामध्ये १२ ते २६ या रेंजमध्ये भाजपला जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपला केवळ दोन जागाच मिळाल्या होत्या.

उत्तर प्रदेशात महाआघाडीमुळे भाजपचे नुकसान होण्याचा अंदाज, जागांसाठी जोरदार टक्कर

एक्झिट पोलच्या अंदाजांनंतर राम माधव म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये यंदा आम्ही सर्वात चांगली कामगिरी करू. राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला पाठिंबा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीत जे उत्तर प्रदेशात पाहायला मिळाले, ते यावेळी पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election 2019 exit poll West Bengal will surprise all the pollsters says ram madhav