पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

उत्तर प्रदेशात महाआघाडीमुळे भाजपचे नुकसान होण्याचा अंदाज, जागांसाठी जोरदार टक्कर

समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी केलेल्या महाआघाडीला चांगले यश मिळण्याचा अंदाज एका एक्झिट पोलने दिला आहे. एबीपी नेल्सनने केलेल्या एक्झिट पोलने महाआघाडीला उत्तर प्रदेशात सर्वाधिक ५६ जागा मिळतील असे म्हटले आहे. भाजपला केवळ २२ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. युपीएला केवळ २ जागा मिळतील, असा अंदाज आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात ७१ जागा मिळाल्या होत्या. त्या यावेळी कमी होण्याची शक्यता सगळ्याच एक्झिट पोलनी दिली आहे. 

Maharashtra Exit Poll : राज्यात पुन्हा एकदा युतीच वरचढ ठरण्याचा अंदाज

रिपब्लिक-सी व्होटर यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात सपा, बसपा महाआघाडीला ४० जागा मिळण्याचा अंदाज आहे तर भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला ३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

टाइम्स नाऊ-व्हीएमआर यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात एनडीएला ५८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाआघाडीला २० जागा मिळण्याचा अंदाज आहे. 

रिपब्लिक टीव्ही-जन की बातच्या एक्झिट पोलनुसार उत्तर प्रदेशात एनडीएला ४६-५७ जागा मिळण्याचा तर महाआघाडीला २१-३२ जागा मिळण्याचा अंदाज आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election 2019 exit poll BSP SP alliance dents BJP in Uttar Pradesh say exit polls