पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'EVM आणि EC नंतर उद्या काँग्रेस मतदारावरही आरोप करेल'

 भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव

निवडणूक आयोग आणि ईव्हीएम मशीन संदर्भात आरोप करणारे उद्या मतदारांवरही आरोप करतील, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी भाजपचा विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे. जनतेला पंतप्रधान म्हणून पुन्हा मोदीजी हवे आहेत. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांच्या साथीने पुन्हा एकदा मजबूत सरकार स्थापन करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

EVMला विरोध करणाऱ्या पक्षांना अमित शहांचे ६ प्रश्नं

उद्या २३ मे रोजी निकालानंतर आपल्या पराभवाचे खापर काँग्रेस मतदारावर फोडायलाही कमी करणार नाही, असेही राम माधव म्हणाले. काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कारभारावर शंका उपस्थित केली. ते ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत आहेत. उद्याच्या निकालानंतर ते मतदारांवरही आरोप करतील, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीचे निकालापूर्वी रविवारी वेगवेगळे एक्झिट पोल जाहीर झाले. या सगळ्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सत्तेच्या जवळ जाईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाज खरे ठरतील, अशा प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून येत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी हे अंदाज खोटे ठरतील, असा दावा केला आहे. अंतिम निकालापूर्वी विरोधकांकडून ईव्हीएम संदर्भातही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 
 
एक्झिट पोल बनावट, निराश होऊ नका; राहुल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Lok Sabha election 2019 After EC and EVMs congress blaming voters tomorrow says BJP Leader Ram Madhav