पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक आयोग दबावाखाली, ममतांच्या समर्थानंतर मायावती यांचा आरोप

मायावती

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मदतीला आता बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती धावून आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे नियोजितपणे ममता बॅनर्जींना लक्ष्य करीत असल्याचा आरोप मायावती यांनी केला. त्याचवेळी त्यांनी निवडणूक आयोग दबावाखाली काम करीत असल्याचे म्हटले आहे.

एएनआयने केलेल्या ट्विटनुसार मायावती यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून भाजपवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपचे नेते ममता बॅनर्जींना लक्ष्य करीत आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. अत्यंत नियोजनपूर्वक हे सगळे सुरू आहे. जे काही घडते आहे ते भयानक असून, देशाच्या पंतप्रधानांना असे वागणे शोभत नसल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

भाजप नेते मोदींकडे जातात, तेव्हा त्यांच्या पत्नीही घाबरतात- मायावती

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरही मायावती यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधानांना त्यांच्या बंगालमधील जाहीर सभा घेता याव्यात, यासाठी तेथील प्रचार गुरुवारी, १६ मे रोजी रात्री दहानंतर बंद करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे, असा आरोप मायावती यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये अमित शहा यांच्या रोड शोवेळी कोलकातामध्ये उसळलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुदतीपूर्वीच प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पश्चिम बंगालमधील नऊ लोकसभा मतदारसंघात रविवारी, १९ मे रोजी मतदान होत आहे. त्याचा प्रचार नियमाप्रमाणे शुक्रवार, १७ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता संपणे अपेक्षित आहे. पण हिंसाचारामुळे निवडणूक आयोगाने प्रचार गुरुवार, १६ मे रोजी रात्री १० नंतर थांबविण्याचे आदेश दिले आहेत. आज (गुरुवारी) नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमध्ये दोन जाहीर सभा होत आहेत. याच मुद्द्यावरून मायावती यांनी निवडणूक आयोग दबावाखाली वागत असल्याचे म्हटले आहे. 

RSS नेही मोदींना मदत करणं बंद केलंय, मायावतींचा आरोप

दरम्यान, प्रचार लवकर संपविण्याच्या निर्णयावर ममता बॅनर्जी यांनीही बुधवारी टीका केली होती. हा निर्णय भेदभाव करणारा आणि अनैतिक असल्याचे त्यांनी म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election 2019 Acting under pressure Mayawati slams EC for curtailing Bengal campaign