पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Loksabha Election 2019 : पाचव्या टप्प्यात ६२.५६ टक्के मतदान

लोकसभा निवडणूक २०१९

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. या टप्प्यामध्ये एकूण सात राज्यांतील ५१ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. आज होणाऱ्या मतदानामध्ये सध्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे भविष्य मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काश्मीरमध्ये एका मतदान केंद्रावर ग्रेनेड फेकण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. दुसरीकडे पश्चिम बंगालसह इतर काही राज्यांमध्ये मतदान यंत्रात EVM बिघाड झाल्यामुळे काहीवेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. यावेळी प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.

*दुपारी ४ वाजेपर्यंत बिहार- ४४.८, राजस्थान- ५०.४४, पश्चिम बंगाल- ६३.५७, झारखंड- ५८.०७, उत्तर प्रदेश- ४४.८९ आणि जम्मू-काश्मीरमध्ये १५.५१ टक्के मतदान

 

आमच्याकडे किंग, त्यामुळे किंगमेकरची गरज नाही - राम माधव

पाचव्या टप्प्यामध्ये एकूण ८.७५ कोटी मतदार ९६ हजार मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी ४२५ जागांवरील मतदान आजच्या टप्प्याअखेर पूर्ण होईल. या टप्प्यामध्ये राजनाथ सिंह यांची लढत लखनऊमधून पूनम सिन्हा यांच्याशी होणार आहे. त्या ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी आहेत. समाजवादी पक्षाने त्यांना येथून उमेदवारी दिली आहे. अमेठीतून राहुल गांधी यांचा मुकाबला स्मृती इराणी यांच्याशी आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी स्मृती इराणी यांना पराभूत केले होते. 

व्यंगचित्रकाराच्या कुंचल्यात जुलमी राजवट उलथवण्याची ताकद- राज ठाकरे

माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद (धौरहरा), सुबोधकांत सहाय (रांची), केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड (जयपूर ग्रामीण), जयंत सिन्हा (हजारीबाग), साध्वी निरंजन ज्योती (फतेहपूर) यांच्येही राजकीय भविष्य आजच मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. 

या जागांवर होणार मतदान

उत्तर प्रदेश (१४ जागा) : अमेठी, रायबरेली, लखनऊ, धौरहरा, सीतापूर, मोहनलाल गंज, बांदा, फतेहपूर, कौशम्बी, बाराबंकी, फैजाबाद, बहराइच, कैसरगंज आणि गोंडा
राजस्थान (१२ जागा) : श्रीगंगानगर, बीकानेर, चूरू, झुंझुनूं, सीकर, जयपूर (ग्रामीण), जयपूर, अलवर, भरतपूर, करौली-धौलपूर, दौसा आणि नागौर
मध्य प्रदेश (७ जागा) : टीकमगढ, दमोह, खजुराहो, सतना, रिवा, होशंगाबाद आणि बैतूल
पश्चिम बंगाल (७ जागा) : बनगांव, बैरकपूर, हावडा, उलुबेरिया, श्रीरामपूर, हुगळी, आरामबाग
बिहार (५ जागा) : सीतामढी, मधुबनी, मुजफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर
झारखंड (४ जागा) : कोडरमा, रांची, खूंटी आणि हजारीबाग
जम्मू-कश्मीर (२ जागा) : लडाख, अनंतनाग

ताज्या घडामोडी

दुपारी तीन वाजेपर्यंत उत्तर प्रदेशातील १४ लोकसभा जागांवर मिळून ४५ टक्के मतदान

दुपारी तीन वाजेपर्यंत राजस्थानमधील १२ लोकसभा जागांवर मिळून ५० टक्के मतदान

मतदानाची टक्केवारी (दुपारी १ पर्यंत)
बिहार - २४.४९
मध्य प्रदेश - ३१.४६
राजस्थान - ३३.८२
उत्तर प्रदेश - २६.५३
पश्चिम बंगाल - ३९.५५
झारखंड - ३७.२४
जम्मू-काश्मीर - ६.५४
एकूण ३१.२९ 

सकाळी ११ वाजेपर्यंत ५१ मतदारसंघात मिळून १६ टक्के मतदान

अमेठीमध्ये मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा स्मृती इराणी यांचा आरोप

मतदानाची टक्केवारी (सकाळी १० पर्यंत)
बिहार - ११.५१
मध्य प्रदेश - १३.१८
राजस्थान - १४
उत्तर प्रदेश - ९.८५
पश्चिम बंगाल - १६.५६
झारखंड - १३.४६
जम्मू-काश्मीर - १.३६
एकूण १२.६५ 

पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड, मतदानाला उशीर

पश्चिम बंगाल - तृणमूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा भाजपचे बराकपोरमधील उमेदवार अर्जुन सिंग यांचा आरोप

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले मतदान

बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी लखनऊमध्ये केले मतदान

केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी जयपूरमध्ये केले मतदान

राजस्थानमध्ये मतदारांमध्ये उत्साह

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:lok sabha election 2019 5 phase of 51 seats in 7 state live coverage seat by seat live streaming