पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकला F-16 विकणारी कंपनी भारताला F-21 देण्यास तयार 

लढाऊ विमान

जर भारताकडून एफ-21 लढावू विमानाचा प्रस्ताव आला तर अन्य राष्ट्राला या विमांनाची विक्री करणार नसल्याचे अमेरिकन विमान कंपनी लॉकहीड मार्टिनने म्हटले आहे. व्यापक स्तरावरील खरेदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, यूरोप आणि रशियाच्या कंपन्या स्पर्धेत उतरण्यापूर्वी या कंपनीने भारताला लढाऊ विमान देण्याची तयारी दर्शवली आहे.  

लॉकहीड मार्टिन कंपनीचे व्यूहरचना आणि व्यावसायिक विस्तार विभागाचे उपाध्यक्ष विवेक लाल यांनी भारताकडून  एफ-21 लढाऊ विमान खरेदीसंदर्भात प्रस्ताव आला तर भारत कंपनीचा जागतिक लढाऊ विमान तंत्रज्ञानाचा हिस्सा असेल असे म्हटले आहे. याची उलाढालही तब्बल १६५ अब्ज डॉलर इतकी असेल. 

२८ दिवसांत ८० प्रचारसभा, सिद्धूंच्या घशाला सूज; आता सक्तीची विश्रांती
 

लाल यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, नवीन लढाऊ विमानांना भारतीय हवाई दलाच्या ६० पेक्षा अधिक विमान तळाचा विचार करुन डिझाइन करण्यात आले आहे. या विमानामध्ये सुपीरियर इंजन मॅट्रिक्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता आणि हत्यारे वाहून नेण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आम्ही आमती हा प्लेटफॉर्म आणि संरचना जगातील अन्य कोणत्याही राष्ट्राला विकणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लॉकहीड मार्टिन कंपनीची ही भूमिका भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधोरेखित करणारी आहे. 

मागील महिन्यात हवाई दलाने जवळपास १८ अरब डॉलर दराने ११४ लढाऊ विमान खरेदीसाठी लेखी विनंती पत्र (रिक्‍वेस्ट फॉर इन्फर्मेशन-RFI) निविदा जारी केली होती. याकडे आगामी काळात सेनेची सर्वात मोठी खरेदी म्हणून पाहिले जात आहे.  खरेदीच्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये लॉकहीड निर्मित एफ-२१, बोइंग एफ/ए-१८, दसॉल्ट एविएशनचे राफेल, यूरोफाइटर टायफून, रशियन लढाऊ विमान मिग ३५ आणि साबचे ग्रिपेन याचा समावेश आहे. 

वंचित बहुजन आघाडीमुळे महायुतीलाच फायदा: रामदास आठवले

लाल म्हणाले की लॉकहीडकडे प्रस्ताव आला तर टाटा समुहासोबत एफ-२१ अत्याधुनिक निर्माण केंद्राची स्थापना करण्यास आम्ही तयार आहोत. यामुळे भारताला संरक्षण निर्माण क्षेत्रातील सर्वांगिण विकास तंत्रासाठी फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.