पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे कोरोनाची पहिली लाट काही प्रमाणात रोखली, पण...

कोरोना विषाणू (संग्रहित छायाचित्र)

जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणू संक्रमणाची पहिली लाट काही प्रमाणात रोखण्यात आपण यशस्वी झालेलो असलो तरी आणखी वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरे जायचे आहे, अशा इशारा जागतिक आरोग्य संघटनेतील कार्यरत अधिकाऱ्यांनी दिला आहे. फ्रान्समधील संशोधकांनी केलेल्या संशोधनाच्या आधारवर त्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत.

कामावर पोहोचण्यासाठी बस कंडक्टर २१ किलोमीटर धावला

कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन त्यातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्व देशांचा विचार केला तर २ ते ३ टक्क्यांच्या आसपास आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटले आहे. जोपर्यंत या विषाणूवर लस उपलब्ध होत नाही, तोपर्यंत स्वतःच्या प्रतिकारशक्तीच्या साह्यानेच या विषाणूचा प्रतिकार करावा लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत झालेल्या संशोधनाच्या प्राथमिक निष्कर्षांतून असे दिसून आले आहे की कोरोनाचा प्रादूर्भाव झालेल्या भागातही खूप कमी लोकांना त्याची लागण झाली आहे. टक्क्यांचा विचार केला तर हा आकडा खूप कमी आहे. पण अजून याचे तीव्र रुप समोर यायचे आहे, असे त्यांनी सोमवारी जीनिव्हात पत्रकार परिषदेत सांगितले होते.

जिओमध्ये फेसबूकची ५.७ अब्ज डॉलरची गुंतवणूक, ...हे आहे कारण

फ्रान्समध्ये केलेल्या संशोधनातील निष्कर्षांनुसार, येत्या ११ मे पर्यंत वेगवेगळ्या देशांमध्ये लागू करण्यात आलेले लॉकडाऊन वेगवेगळ्या वेळी संपुष्टात येतील. तोपर्यंत जगभरात अंदाजे ३७ लाख लोकांना या विषाणूचा संसर्ग झालेला असेल. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत हा आकडा ५.७ टक्के इतका आहे. समूह प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी ही टक्केवारी कमी आहे. त्यामुळे या विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट अजून यायची आहे.