पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनमुळे गरीब लोक उद्ध्वस्त होतील, राहुल गांधींची टीका

राहुल गांधी

देशात लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता उद्ध्वस्त होईल. या विषयाकडे मानवतेच्या दृष्टीने बघितले पाहिजे, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला मुद्दा मांडला. गेल्या बुधवारपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. 

धक्कादायक! बारामतीत लॉकडाऊन दरम्यान १० पोलिसांना मारहाण

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे देशातील गोरगरीब लोक उद्ध्वस्त होतील. त्यामुळे ज्या भारतावर आपण सगळे प्रेम करतो, त्यावर मोठा ठपका बसेल. भारतात दोनच गट नाहीत. त्यामुळे इथे निर्णय घेताना काळजीपूर्वक सखोल विचार करावा लागतो. या परिस्थितीशी लढण्यासाठी अधिक समावेशक विचार करण्याची गरज आहे. 

काँग्रेस पक्षानेही आपल्या हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये भाजप सरकारवर टीका केली. कोणताही विचार किंवा नियोजन न करता देशात लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. ज्या कामगारांना आता परत आपल्या गावाकडे जायचे आहे. ते सुद्धा यामुळे अडचणीत आले आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

रेल्वेगाड्यातही विलगीकरण कक्ष तयार, कोचमध्ये अनेक बदल

लॉकडाऊननंतर अनेक शहरांमध्ये रोजंदारीवर काम करणारे कामगार अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याची कोणतीही व्यवस्था नाही, असे वृत्त प्रसारित झाल्यानंतर काँग्रेसने ही टीका केली.