पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन हे काही कोरोनावर उत्तर नाही, तो केवळ तात्पुरता पर्याय - राहुल गांधी

राहुल गांधी

लॉकडाऊन हा केवळ कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी तात्पुरता पर्याय आहे. ते काही या आजारावर उत्तर नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या कोरोना विषाणू चाचणी पुरेशा प्रमाणात होत नसल्याचा आरोपही केला आहे.

आर्थिक क्षेत्रात भारताने उचललेले पाऊल योग्यः आयएमएफ

राहुल गांधी म्हणाले, सध्या आपण सगळेच गंभीर परिस्थितीतून जात आहोत. देशातील सर्व नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी अशा वेळी एकत्रितपणेच काम केले पाहिजे. मी कोरोना विषाणू संक्रमणासंदर्भात देशातील आणि परदेशातील अनेक तज्ज्ञांशी बोलत आहे. हा विषय नेमकेपणाने समजून घेत आहोत. त्यातून मला इतकेच दिसले की लॉकडाऊन हा केवळ तात्पुरता पर्याय आहे. ते काही या आजारावर उत्तर नाही.

चिंताजनकः सोलापुरात १० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

जेव्हा सरकार लॉकडाऊन मागे घेईल आणि पुन्हा सगळे आपल्या घराबाहेर पडतील. त्यावेळी हा विषाणू पुन्हा एकदा संक्रमणाचे काम सुरू करेल, असे सांगून ते म्हणाले, आपल्याला या विषयावर आत्ताच एक धोरण निश्चित केले पाहिजे. आपल्याला चाचणी करण्याची सुविधा वेगाने वाढविली पाहिजे. कोरोनासाठी खास रुग्णालये वेगाने तयार केली पाहिजेत. चाचणी हे सर्वात मोठे अस्त्र आहे. येत्या काळात त्याचाच आपल्याला वापर करावा लागेल. जास्तीत जास्त चाचण्या करून रुग्ण शोधणे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधणे ही प्रक्रिया गतिमान करावी लागेल, असे त्यांनी सांगितले.