पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिहारमध्ये चिदंबरम यांना कोणत्याही विशेष सुविधा नाही, फक्त...

पी चिदंबरम

दिल्लीतील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांची गुरुवारी तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली. तुरुंगामध्ये चिदंबरम यांना कोणत्याही विशेष सुविधा दिल्या जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी कळविले आहे. चिदंबरम यांना विशेष बराकीमध्ये ठेवण्यात यावे आणि त्यांना पाश्चिमात्य पद्धतीचे शौचालय उपलब्ध करून दिले जावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. त्याप्रमाणे चिदंबरम यांना या गोष्टी दिल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

चांद्रयान २ साठी महत्त्वाचा क्षण, विक्रम लँडर शनिवारी चंद्रावर उतरणार

तुरुंगाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिदंबरम हे इतर कैद्यांप्रमाणे तुरुंगातील ग्रंथालयाचा वापर करू शकतात. त्याचबरोबर ठराविक वेळेत ते टीव्हीसुद्धा पाहू शकतात. चिदंबरम यांची शारीरिक तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना बराक क्रमांक ७ मध्ये ठेवण्यात आले. सक्तवसुली संचालनालयाकडील आरोपींना सामान्यपणे याच बराकीमध्ये ठेवण्यात येते. याच प्रकरणामध्ये चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांनाही गेल्यावर्षी १२ दिवसांसाठी याच बराकीमध्ये ठेवण्यात आले होते.

रशिया दौऱ्यातील मोदींच्या 'या' व्हायरल व्हिडीओचे होतेय कौतुक

तुरुंगातील पहिल्या दिवशी चिदंबरम यांनी हलके भोजन केले. त्याचबरोबर त्यांनी त्यांची नेहमीची औषधे घेतली, असे तुरूंग प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यास त्यांना याच तुरुंगात आणले जाईल, याचा विचार करून तिहारमधील एक बराक सज्ज ठेवण्यात आली होती, अशीही माहिती सूत्रांनी दिली.