पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणात चौघांना जन्मठेप, एकाची निर्दोष सुटका

आयोध्या परिसरात २००५ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता.

चौदा वर्षांपूर्वी अयोध्येत झालेल्या दहशतवादी हल्लाप्रकरणात चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय त्यांना प्रत्येकी ४० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. या प्रकरणातील एका आरोपीला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. प्रयागराजच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला.   

५ जुलै २००५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा रक्षकांनी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यात दोन नागरिकांनाही आपला जीव गमावला होता. तर सात जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणातील तपासानंतर दहशतवाद्यांची मदत केल्याप्रकरणी  डॉ. इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नसीम, मोहम्मद अजीज आणि फारूक हे पाचजण तुरुंगात होते. यातील मोहम्मद अजीजची निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. तर इतर चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 

३५० खासदारांचे बहुमत हा राम मंदिराचाच जनादेश - शिवसेना

मागील १४ वर्षांपासून सुरु असलेल्या प्रकरणाची ९ जूनला सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायाधीशांनी  निर्णय घेण्यासाठी १८ जून ही तारीख दिली होती. या हल्ल्यातले दहशतवादी राम भक्त बनून अयोध्येत शिरले होते. त्यांनी या परिसराची रेकी केली. त्यानंतर त्यांनी स्फोटकाने भरलेली टाटा सुमो गाडीसह रामजन्मभूमी परिसरात घुसले होते.