पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'२६/११ चा हल्ला हा 'हिंदू दहशतवादी' दाखवण्याचा कट शिजला होता'

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोकांनी आपला जीव गमावला होता.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी लिहिलेल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राकेश मारिया यांनी या पुस्तकातून त्यांच्या कारकिर्दीतील काही अनुभव शेअर केले आहेत. यात त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक प्रकरणांवर भाष्य करताना काही धक्कादायक गोष्टी मांडल्या आहेत. २००८ मध्ये मुंबईमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा 'हिंदू पुरस्कृत' दाखवण्याचा कट रचण्यात आला होता, असा उल्लेख त्यांनी केला आहे. फाशीची शिक्षा देण्यात आलेल्या अजमल कसाबला बंगळुरुस्थित समीर चौधरी म्हणून वापर करण्याचा लष्करे तैय्यबाचा डाव होता, असेही त्यांनी म्हटले आहे.  

 

राज्यात NRC लागू होऊन देणार नाही: मुख्यमंत्री

इंटरसव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय ही पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आणि लष्करे तैय्यबा दहशतवादी संघटना कसाबला तुरुंगात मारणार होते. याची सुपारी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगला देण्यात आली होती. जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले असते तर कसाब हा चौधरी नावाने मारला गेला असता आणि मुंबईतील हल्ल्यामागे हिंदू दहशतवादाचा ठपका बसला असता, असे राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे.  

शीना बोरा प्रकरणात देवेन भारतींनी महत्त्वाची माहिती

लष्करे तैय्यबाच्या दहशतवाद्यांकडे भारतातील पत्ता असणारी ओळखपत्रे बाळगली होती. दहशतवादी हल्ल्यानंतर कसाबचा जो फोटो बाहेर आला त्यावर मारियांनी लिहिलंय की, त्याच्यासंदर्भातील कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये लिक होणार नाही याची मुंबई पोलिसांनी खबरदारी घेतली होती. मात्र केंद्रीय संस्थांमुळे हा फोटो बाहेर आला. फोटोमध्ये कसाबच्या उजव्या दंडाला लाल रंगाचा धागा बांधल्याचे समोर आले होते. हा धागा हिंदूसाठी पवित्र मानला जातो, असेही त्यांनी म्हटले आहे.   

धक्कादायक! जमिनीवर बसून विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परिक्षा

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ लोकांनी आपला जीव गमावला होता. यामध्ये ३०० हून अधिक जण जखमी झाले होते. यावेळी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश आले होते. २१ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याला फाशी देण्यात आली होती.