पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमरनाथ यात्रेवर हल्ल्याचे सावट, यात्रेकरूंना काश्मीर खोऱ्यातून बाहेर जाण्याची सूचना

अमरनाथ यात्रा

दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर सरकारने सर्व अमरनाथ यात्रेकरूना तातडीने आपली यात्रा स्थगित करण्याची सूचना केली आहे. यात्रेकरूंनी काश्मीर खोऱ्यातील आपला मुक्कामही हलवावा, असेही या सूचनेमध्ये म्हटले आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर हल्ला होण्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने हे निर्देश जारी केले आहेत.

काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी CTO, HR विभाग नेमण्याची शिफारस

अमनाथ यात्रेकरूंवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे लष्कराच्या आणि पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर लगेचच यात्रेकरूंसाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. लेफ्टनंट जनरल केजेएस धिल्लाँ यांनी संयुक्त पत्रकार परिषेदत सांगितले की, अमरनाथ यात्रा मार्गावर गेल्या तीन दिवसांपासून सुरक्षादलांकडून सखोल तपासणी केली जात आहे. यावेळी यात्रा मार्गावर एक भूसुरूंग सापडला असून, त्यावर पाकिस्तानी दारुगोळा कारखान्याचा शिक्का आहे. त्याचबरोबर सुरक्षादलांना अमेरिकी एम २४ रायफलही मिळाली आहे.

EVM विरोधात उठावाची विरोधकांची हाक, २१ ऑगस्टला पक्षविरहित मोर्चा

सुरक्षा दलांकडून जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने विविध ठिकाणी शोध मोहिम राबविली जाते. त्यामुळे घातपाताच्या अनेक घटना टाळल्या जातात, याकडेही धिल्लाँ यांनी लक्ष वेधले.