दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने दिल्ली पोलीस कर्मचारी पुकारलेले आंदोलन ११ तासानंतर मागे घेण्यात आले आहे. शहरातील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी पोलीस आणि वकिलांमध्ये झालेले हाणामारीच्या प्रकरणानंतर वकिलांनी संप पुरकारल्यानंतर मंगळवारी पोलीस कर्मचाऱ्यांनीही आंदोलन छेडले होते. आयुक्तांनी मागण्या मान्य केल्यानंतर पोलिसांनी आंदोलन मागे घेतले.
How is the Josh? Low Sir... दिल्ली पोलिसांची निदर्शने, आयुक्तांनी ड्युटीवर परतण्याचे दिले आदेश
आंदोलनात सहभागी झालेल्या पोलिसांनी आयुक्तांकडे पाच प्रमुख मागण्या केल्या होत्या. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेणे, वकिलांकडून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई, वकिलांविरोधात कठोर कारवाई, याप्रकरणातील उच्च न्यायालयातील आदेशावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे, आणि वकिलांच्या विरोधात चौकशी समितीची नियुक्ती करणे या मागण्यांचा समावेश होता.
दिल्ली पोलिस-वकील वाद; पोलिस मुख्यालयाबाहेर पोलिसांचे आंदोलन
या प्रकरणी चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने समिती नेमली असून ही समिती आपले काम चोखपणे करुन पोलिसांना न्याय मिळवून देईल, असे दिल्लीचे पोलिस आयुक्त अमूल्य पटनाईक यांनी सांगितले होते.