पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, कुटुंबीयांकडून माहिती

लता मंगेशकर

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना प्रकृतीच्या कारणावरून मुंबईतील ब्रिचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. लता मंगेशकर या ९० वर्षांच्या आहेत. श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना पहाटे २.३० च्या सुमारास  ब्रीचकँडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं.

शेतकऱ्यांच्या अजेंड्यावर शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र काम करणार

'लता दीदींना व्हायरल चेस्ट इन्फेक्शनचा त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यात सुधारणा होत आहे. त्यांचे वय लक्षात घेता आजार अधिक बळावू नये म्हणून त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं, अशी माहिती त्यांची भाची रचना शाह यांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली. 

सोमवारी पहाटे श्वसनाचा त्रास होत असल्यानं लता मंगेशकर यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिली होती.

अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत

लता मंगेशकर या ९० वर्षांच्या आहेत. बॉलिवूडमधली १ हजारांहून अधिक हिंदी गाणी लतादीदींनी गायली आहेत. २००१ मध्ये भारत रत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं लतादीदींचा सन्मान करण्यात आला.