पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबीयांना १ कोटींची आर्थिक मदत

रतनलाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

दिल्लीमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थक आणि विरोधक आमने-सामने आल्यानंतर हिंसाचार झाला. या हिंसाचारावेळी दिल्ली पोलिस दलाचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचा मृत्यू झाला. रतन लाल यांच्या पार्थिवावर बुधवारी राजस्थान येथील सीकर जिल्ह्यातील त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोनिया गांधींच्या वक्तव्याचा जावडेकरांकडून समाचार

दिल्ली हिंसाचारावेळी मृत्यू झालेले रतनलाल राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील तिहावली गावामध्ये राहणारे होते. दिल्लीतील गोकूळपूर एसीपी कार्यालयात हेड कॉन्स्टेबल पदावर ते तैनात होते. २४ फेब्रुवारी रोजी दिल्ली हिंसाचारावेळी करण्यात आलेल्या दगडफेकीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना शहीदाचा दर्जा मिळावा यासाठी त्यांच्या गावातील नागरिक धरणे आंदोनाला बसले होते. 

दगडफेकीत ठार झालेल्या गुप्तचर अधिकाऱ्याचा मृतदेह सापडला

दरम्यान, केंद्र सरकारने रतन लाल यांना शहीदाचा दर्जा दिला आहे. सीकरचे खासदार स्वामी सुमेधानंद सरस्वती यांनी सांगितले की, 'शहीद रतन लाल यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून एक कोटींची मदत दिला जाणार आहे. रतन लाल यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. तसंच, शहीदांच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सुविधा रतन लाला यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.  

शांतता आणि बंधुभाव राखा, नरेंद्र मोदींचे दिल्लीकरांना आवाहन

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:last rites ceremony of delhi police head constable rattan lals who lost his life during delhi violence