पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हॅटट्रीकसह असा पराक्रम करणारा मलिंगा पहिला गोलंदाज

लसिथ मलिंगा

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगाने अनोख्या विक्रमाची नोंद केली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मलिंगाने टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा हॅटट्रीक करण्याचा पराक्रम केला. एकंदरीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याची ही ५ हॅटट्रीक आहे. एकदिवसीयमध्ये त्याने तब्बल तीन वेळा हॅटट्रीकचा पराक्रम केला आहे.

US OPEN 2019: महिला एकेरीत युवा जोश अन् अनुभवी होश यांच्यात फायनल

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने निर्धारित २० षटकात ८ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारली होती. या धावांच्या पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किवी फलंदाजांचा मलिंगाने चांगलाच समाचार घेतला. त्याने डावातील तिसऱ्या षटकात कॉलिन मुन्रो, हमीश रुदरफोर्ड, कॉलिन डी-ग्रँडहोम आणि रॉस टेलर यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ चेंडूत ४ बळी घेण्याची मलिंगाची ही दुसरी वेळ ठरली.

सेहवाग म्हणतो, जर सचिनची कॉपी केली असती तर...

यापूर्वी २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात मलिंगाने असाच पराक्रम केला होता. या सामन्यात मलिंगाने न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत धाडताना निर्धारित ४ षटकात केवळ ६ धावा खर्च केल्या. मलिंगाच्या माऱ्यासमोर बिथरलेला न्यूझीलंडचा १६ षटकांत अवघ्या ८८ धावांत गारद झाला.