पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुरक्षादलांना मोठे यश; 'लष्कर' मॉड्यूल उद्ध्वस्त, ८ दहशतवाद्यांना अटक

भारतीय लष्कर (संग्रहित छायाचित्र)

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर मागील एक महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठी घट झाली आहे. याचदरम्यान सुरक्षादलांनी बारामुल्ला येथे मोठे यश मिळाले आहे. लष्कर ए तोयबाचे एक मोठे मॉड्यूल सुरक्षादलांनी उद्ध्वस्त करत ८ दहशतवाद्यांना अटक केले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

सात दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसण्याच्या तयारीत

सुरक्षादलांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला येथील सोपोरमध्ये लष्कर ए तोयबाचे दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. अचूक माहिती मिळाल्यानंतर परिसराला घेराव घातला गेला. शोध मोहिमेदरम्यान संशयित लोकांना अटक करण्यात आली. प्रारंभीच्या चौकशीत त्यांचा लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याचे समोर आले. 

ज्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे, ते दुकानदारांना दुकाने बंद करण्याची धमकी देत होते, असे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर ते धमकीचे पोस्टर्स लावण्यातही सहभागी होते. श्रीनगरमध्ये डाऊन टाऊन येथे पोस्टर लावण्याचे वृत्त आले होते. यासंबंधी सुरक्षादलांनी काश्मीर खोऱ्यातील स्थिती बिघडवणारे कृत्य कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचे म्हटले होते.

भाजप नेत्याने टोल कर्मचाऱ्याला केली मारहाण

दरम्यान, पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जात आहे. भारताकडून याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. सोमवारी भारतीय लष्कराने एलओसीवर पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या. यामध्ये पाकच्या बॅट पथकाच्या पाच सैनिकांनाही मारण्यात यश आले होते.