जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवान यांनी संयुक्त कारवाई केली. सोपोरच्या बराथगुंड भागामध्ये ही चकमक झाली. ठार केलेल्या दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठी जवानांनी जप्त केला आहे.
J&K Police on today's Sopore encounter: The neutralised terrorist has been identified as Adnan Ali Channa who was affiliated with terror outfit, Lashkar-e-Taiba (LeT). Case registered pic.twitter.com/eCsNHnlKPS
— ANI (@ANI) July 17, 2019
मिळालेल्या माहितीनुसार, सोपोर भागामध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेश सुरु केले. तर लपून बसलेल्या दहशतवाद्याने त्यांच्यावर गोळीबार केला. जवानांनी दहशतवादी लपून बसलेल्या घराला घेराव घातला आणि चकमक सुरु झाली.
जमिनीच्या वादातून उत्तर प्रदेशात दोन गटांत गोळीबार; ९ ठार
प्रशासनाने सोपोर परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली तसंच सोपोरेमधील कॉलेज देखील बंद करण्याचे आदेश दिले. चकमकी दरम्यान जवानांना एका दहशताद्याला ठार करण्यात यश आले. मात्र घटनास्थळावर स्थानिकांनी जवानांना अडवण्याचा प्रयत्न करत आंदोलन सुरु केले. जमावाला हटवण्यासाठी घटनास्थळावर अतिरिक्त पोलिसांना बोलवण्यात आले. चकमकी दरम्यान ठार केलेला दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा असून त्याची ओळख अदनान अली चन्ना अशी झाली आहे.