पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी असाही लढा, घरमालकाने घरभाडे केले माफ!

कोरोना विषाणू

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी एकीकडे जगातील आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत असताना दुसरीकडे सामाजिक भान राखून काही गुणीजन सर्वसामान्यांसाठी मदतीचा हात पुढे करीत आहेत. अशीच एक घटना अमेरिकेतील पोर्टलॅंडमध्ये घडली आहे. पोर्टलॅंडमधील एका घरमालकाने कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या दोन भाडेकरूंचे पुढील महिन्याचे भाडे वसुल न करण्याचे ठरविले आहे. या भाडेकरूची एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.

भीमा-कोरेगाव प्रकरण : शरद पवारांना साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले

नाथन निकोलस असे या घरमालकाचे नाव आहे. त्याने त्याच्या फेसबुकवर या संदर्भातील एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये त्याने कोरोना विषाणूचे आर्थिक परिणाम लक्षात घेता एप्रिल महिन्याचे भाडे वसुल न करण्याचे ठरविले आहे. आपण ज्या पद्धतीने हा निर्णय घेतला आहे. त्याचे अनुकरण इतरही करतील आणि या कठीण प्रसंगात एकमेकांची मदत करतील, याचा विचार करून त्याने ही माहिती फेसबुकवर शेअर केल्याचे म्हटले आहे.

माझी बहिण एका रेस्तराँमध्ये काम करते. पण कोरोनाला अटकाव करण्यासाठी जे निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे तिला या काळात उत्पन्न मिळणार नाही. आपल्याला उत्पन्न मिळणार नसल्याच्या विचारानेही तिला नैराश्य आले असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मराठवाड्यासह विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपले; शेतीचे मोठे नुकसान