पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमधील पूरस्थितीने उप मुख्यमंत्रीही रस्त्यावर, लालूंचा काढला चिमटा

बिहारचे उप मुख्यमंत्र्यांचा हा फोटो व्होतोय व्हायरल

बिहारमध्ये सध्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने आतापर्यंत जवळपास १२० जणांचा बळी घेतला आहे. बिहारचे उप मुख्यमंत्री सुशील मोदी यांना चक्क रेस्क्यू करुन बाहेर काढण्यात आले. मागील तीन दिवसांपासून ते राजेंद्र नगर येथील आपल्या निवासस्थानी अडकून होते. एसडीआरएफच्या टीमने सोमवारी कुटुंबियांसह त्यांना सुरक्षित बाहेर काढले.

नुसती युती नव्हे महायुती! पण.. फॉर्म्युला अद्यापही गुलदस्त्यातच

सुशील मोदी कुटुंबियांसह रस्त्यावर थांबलेला एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये ते आपल्या सामानासह हाफ पँन्टमध्ये रस्त्यावर उभे असल्याचे दिसते. हा फोटो ट्विट करत राजदचे नेते लालू प्रसाद त्यांनी त्यांची फिरकी घेतली आहे.  लालू प्रसाद यादव यांच्या ट्विटरवरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये लिहलंय की 'बिहामध्ये एवढा विकास केलाय की आपल्या नितिश कुमार सरकारच्या १५ वर्षांच्या विकासासह  मोदी रस्त्यावर आले आहेत.  

गुजरातमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली; २१ जणांचा मृत्यू

तेजस्वी यादव यांनी देखील सुशील मोदी यांचा फोटो शेअर करुन त्यांना उपरोक्त टोला लगावला आहे. पाटणाच्या जनतेने त्यांना १५ वर्षे निवडून दिले. पण त्यांनी काहीच विकास केला नाही, त्यामुळेच पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ट्विट तेजस्वी यादव यांनी केले आहे.