पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लालू प्रसाद यादव ११व्या वेळी आरजेडीचे अध्यक्ष

लालूप्रसाद यादव

माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष झाले आहेत. आरजेडीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयामध्ये लालू प्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. एकच उमेदवारी अर्ज असल्यामुळे लालू प्रसाद यादव ११ व्या वेळी आरजेडीचे अध्यक्ष झाले आहेत.

पंकजा मुंडेंच्या फेसबुक पेजवरुन गायब झालेले कमळ उमलले

अशी चर्चा होती की, लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांची आरजेडीचे अध्यक्ष पदी नियुक्ती केली जाऊ शकते. मात्र ऐन वेळी लालू प्रसाद यादव यांना पुन्हा एकदा अध्यक्ष बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या लालू प्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी रांचीच्या बिरसा मुंडे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. 

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली डोंबिवलीच्या रेल्वे प्रवाशांची व्यथा

लालू प्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज आरजेडीचे आमदार भोला यादव यांनी दाखल केला होता. यावेळी आरजेडीचे वरिष्ठ नेता तेजस्वी यादव यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच लालू प्रसाद यादव यांच्या गैरहजेरीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. 

Video : अप्रतिम त्रिफळा उडवला, पण वहाबचाच 'बकरा' झाला