पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Kulbhushan Verdict : हा भारताचा विजय, निकालाचं नेत्यांकडून स्वागत

सुषमा स्वराज


आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी कुलभूषण जाधव प्रकरणात भारताची बाजू उचलून धरताना त्याच्या फाशीच्या शिक्षेला दिलेली स्थगिती कायम ठेवली. या प्रकरणाचा निकाल भारताच्या बाजूनं लागल्यानं  ट्विटरवर राजकीय  नेत्यांनी आनंद आणि निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. हा भारताचा विजय असल्याचं ट्विट माजी परराष्ट्रमंत्री  सुषमा स्वराज यांनी केलं आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या निकालाचं आम्ही स्वागत करतो, हा नक्कीच भारताचा विजय आहे असं सुषमा स्वराज म्हणाल्या. यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही मानले. 


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या निकालाचे स्वागत केले आहेत. हा निसंशय भारताचा विजय असल्याचं त्यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. 

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निकालाचं स्वागत केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरिश सावळे यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी मानले आहेत.

काँग्रेसनंही या निकालाचं स्वागत केलं आहे.

कुलभूषण जाधव  प्रकरणात पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केले असल्याचे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर कुलभूषण जाधव याला पाकिस्तानमधील न्यायालयातील सुनावणीवेळी भारताकडून दिली जाणारी राजनैतिक मदत मिळाली पाहिजे, यावरही न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. १५ विरुद्ध एक मताने न्यायालायने आपला निकाल दिला.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:kulbhushan jadhav verdict great victory for india sushma swaraj Defence Minister Rajnath Singh