पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोमूत्र प्यायल्याने कोरोना बरा होतो असा दावा करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याला अटक

गोमुत्र सेवन कार्यक्रमाचे आयोजन

गोमूत्र प्यायल्याने कोरोना विषाणूची लागण होत नाही. तसंच ज्याला कोरोनाची लागण झाली आहे ती व्यक्ती सुध्दा बरी होते असा दावा करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्याला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. या भाजपच्या कार्यकर्त्याने गोमूत्र सेवन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर एक व्यक्ती आजारी पडली. त्यामुळे पोलिसानी भाजप कार्यकर्त्याविरोधात कारवाई करत त्याला अटक केली. 

कोरोना: राज्यात आठ नव्या लॅब सुरु करणार -आरोग्यमंत्री

पोलिसांनी सांगितले की, 'गोमूत्र प्यायल्यानंतर आजारी पडलेल्या व्यक्तीने तक्रार दाखल केल्यानंतर मंगळारी रात्री उशिरा भाजप कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली. उत्तर कोलकाताच्या जोरासाखो भागामध्ये भाजपचा स्थानिक कार्यकर्ता नारायण चटर्जी (४० वर्ष) यांनी सोमवारी गोशाळेमध्ये गो पुजाचे आयोजन करत गोमूत्र सेवन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.' 

परदेशात २७६ भारतीयांना कोरोनाची लागण: परराष्ट्र मंत्रालय

भाजप कार्यकर्त्याने आयोजित केलेल्या गोमूत्र सेवन कार्यक्रमात एक व्यक्ती सहभागी झाली होती. या व्यक्तीने गोमूत्र प्यायले आणि मंगळवारी ही व्यक्ती आजारी पडली. त्यानंतर त्याने स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन भाजप कार्यकर्ता चटर्जींविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चटर्जींना अटक केली. दरम्यान, चटर्जी यांच्या अटकेनंतर भाजपने राज्य सरकारचा निषेध केला. 

पुण्यातील मद्य विक्रीची दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश