पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेच्या मित्रासह ४ जण अटकेत

प्रतिकात्मक छायाचित्र

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे गुरुवारी सायंकाळी घरी परतलेल्या बेपत्ता मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. घरी परतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलीने चार जणांनी आपल्यावर बलात्कार केल्याचे सांगितल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हर्षवर्धन जाधव यांची घरवापसी; राज ठाकरेंच्या उपस्थितीत 'मनसे'प्रवेश

या चारही संशयित आरोपींनी आपल्याला बळजबरीने दारु पाजवल्याचा आरोपही पीडित मुलीने केला आहे. मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना पर्णश्री क्षेत्रातून तर इतर दोघांना इक्बालपूर येथून शुक्रवारी दुपारी अटक केली. 

ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात; ७ जण ठार

सर्व आरोपींवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने दावा केला आहे की, ६ फेब्रवारी रोजी सायंकाळी ती आपल्या मित्राला भेटण्यासाठी इक्बालपूरला गेली होती. तिच्या मित्राने तिला एका घरात नेले. तिथे आधीच तिघे उपस्थित होते. त्या सर्वांनी मुलीला बळजबरीने दारु पाजली आणि आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला.

कुठलाही हेतू मनात ठेवून इथं आलो नाही : शरद पवार

याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.