पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प-मेलानिया यांच्यासाठी कोहिनूर सुट बुक, एका दिवसाचे भाडे ११ लाख

ट्रम्प-मेलानिया यांच्यासाठी कोहिनूर सुट बुक, एका दिवसाचे भाडे ११ लाख

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद, आग्रा आणि दिल्ली सज्ज झाली आहे. ट्रम्प आज (सोमवार) सकाळी ११.४० वाजता अहमदाबाद येथे पोहोचतील. त्यानंतर जगातील दोन सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील शक्तिशाली नेते मोटेरा स्टेडियमवर एकाचवेळी विशाल जनसमुदायास संबोधित करतील. मैत्री, रणनितीक आणि सामारिक भागिदारी, दहशतवादविरोधात भूमिका आणि व्यापारावर विस्तृत चर्चा दिल्लीत होईल परंतु, त्याची झलक ट्रम्प आणि मोदींच्या भाषणांत पाहायला मिळू शकते. 

अशी असेल ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याची रुपरेषा

ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया सोमवारीच आग्रा येथे जातील आणि ताजमहल पाहिल्यानंतर पूर्व प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हॉटेल अमरविलास येथे ते जातील. तिथे त्यांच्यासाठी कोहिनूर सुट आरक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्याच मजल्यावरील इतर खोल्या अमेरिकन दलासाठी आरक्षित करण्यात आले आहेत. ट्रम्प कोहिनर सुटमधूनही ताजमहल पाहू शकतात. त्यांच्या भोजनात अमेरिकन पदार्थांसह भारतीय व्यंजनाचाही समावेश करण्यात आला आहे. हॉटेल द ओबेराय अमरविलास हे सप्त तारांकित श्रेणीचे हॉटेल आहे. 

‘नमस्ते ट्रम्प’! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आजपासून भारतभेटीवर

येथील कोहिनूर सूट हे हनिमून सुट या नावानेही ओळखले जाते. यापूर्वी येथे फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोजी आणि त्यांच्या पत्नी कार्ला ब्रूनी यांनी मुक्काम केला होता. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशरर्फ आणि त्यांच्या पत्नी सबा मुशरर्फ हेही उतरले होते. 

थुंकी लावून पानं पलटू नका, कर्मचाऱ्यांना आदेश

विशेष गोष्टी
- ११ लाख रुपये प्रतिदिन भाडे

- ३५०० वर्गफूटमध्ये आहे कोहिनूर सूट

- एक बेडरुम, एक डायनिंग रुमशिवाय किचन, बाथरुम आणि शॉवर आहे.

- सूटमधून ताजमहलचे मनोहरी दृश्य दिसते.