पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७०: जाणून घ्या कोणता पक्ष सरकारबरोबर, कोणता विरोधात

खासदार संजय राऊत

संविधानातील कलम ३७० हटवल्यानंतर सरकारच्या निर्णयावर राज्यसभेत चर्चा होत आहे. या चर्चेत भाग घेणाऱ्या बहुतांश राजकीय पक्षांनी सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तामिळनाडूतील एआयडीएमके, ओडिशातील बिजू जनता दल (बीजेडी), शिवसेना, बसपा, वायएसआर काँग्रेस, आम आदमी पार्टीने जम्मू- काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम हटवण्याचे समर्थन केले आहे. 

हा क्रांतीकारक नव्हे तर राजकीय निर्णयः सोली सोराबजी

तर काँग्रेस, सीपीआयएम आणि आरजेडी, एमडीएमके, डीएमकेने याचा तीव्र शब्दांत विरोध केला आहे. ज्यावेळी हे नेते संसदेत बोलत होते. तेव्हा प्रस्तावाला विरोध करणाऱ्यांनी गदारोळ घातला. 

बीजेडीने ३७० कलम हटवण्याचे समर्थन करताना म्हटले की, जम्मू-काश्मीर आज खऱ्या अर्थाने भारताचा भाग बनला आहे. पक्षाचे खासदार प्रसन्न आचार्य म्हणाले की, या निर्णयामुळे भारताची ताकद वाढली आहे. ज्या दिवशी भारत पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात घेईल, त्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत. या प्रस्तावाचा विरोध करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला.

कलम 370: केंद्राकडून लष्कर आणि वायूदलाला हाय अलर्ट जारी

विशेष म्हणजे बसपाने या प्रस्तावाचे समर्थन केले. खासदार सतीशचंद्र मिश्रा म्हणाले की, कलम ३७० संपुष्टात आल्यानंतर संपूर्ण देशातील मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्य करणे आणि संपत्ती खरेदी करण्याचा अधिकार मिळेल. त्यामुळे पक्षप्रमुख मायावती यांनी या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आपचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याचे स्वागत केले.

जम्मू-काश्मीर होणार केंद्रशासित प्रदेश; कसे बदलणार अधिकार जाणून घ्या

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:know which political parties are in support of revoking article 370 and which are against