पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीरमध्ये अतिरिक्त जवानांच्या तैनातीवर राज्यपाल म्हणतात..

राज्यपाल सत्यपाल मलिक

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या एका शिष्टमंडळाची शनिवारी भेट घेत राज्याच्या संवैधानिक तरतुदीमध्ये कोणत्याही बदलाची माहिती नसल्याचे म्हटले. तसेच अतिरिक्त निमलष्करी दलाची तैनाती ही केवळ सुरक्षेच्या कारणास्तव केल्याचे त्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. 

राजभवनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यपालांनी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळाला निमलष्कराबाबत आश्वस्त केले. सुरक्षा स्थितीच अशी निर्माण झाली आहे की, तात्काळ कारवाईसाठी याची आवश्यकता होती, असे ते म्हणाले.

जम्मू काश्मीरमध्ये नक्की काय सुरु आहे? अब्दुल्ला यांचा संतप्त सवाल

राज्यपालांनी प्रतिनिधी मंडळाला म्हटले की, अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्यासंबंधी सुरक्षा संस्थांना विश्वसनीय माहिती मिळाली होती. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार वाढवण्यात आला होता. त्याला सैन्यदलाकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले. 

जम्मू-काश्मीरच्या संवैधानिक तरतुदीत कोणत्याही प्रकारच्या बदलाबाबत राज्याला कोणतीच माहिती नाही. त्यामुळे सैनिकांच्या तैनातीचा या प्रकाराशी नाहक संबंध जोडून भीतीदायक स्थिती निर्माण करु नका, असे ते म्हणाले. 

अमरनाथ यात्रेकरुंबाबत घेतलेल्या निर्णयावर मेहबुबा-अब्दुल्लांचा सवाल

आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्याची राज्याची जबाबदारी आहे. त्यासाठी योग्य त्या उपाययोजने अंतर्गत यात्रेकरु आणि पर्यटकांना परतण्यास सांगण्यात आले आहे. राजकीय पक्षांनी त्यांच्या समर्थकांना शांत राहण्यास आणि खोऱ्यात पसरणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

काश्मीरप्रश्नी चर्चेसाठी भारताला तयार करा, पाकची अमेरिकेला विनंती