पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोना विषाणूमुळे उत्तर प्रदेशातील एक गाव बनले थट्टेचा विषय

कोरोना विषाणू

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊपासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेले एक छोटेसे गाव सध्या संकटात सापडले आहे. एका रात्रीत हे गाव आणि येथील ग्रामस्थ बाहेरील गावातील लोकांचा चर्चेचा आणि थट्टेचा विषय ठरले आहेत. कारण या गावाचे नाव आहे, 'कोरौना' जे घातक 'कोरोना' विषाणूशी साधर्म्य असणारे आहे. 

कोरोनाच्या मर्यादित समूह संसर्गाला देशात सुरुवात, आरोग्य मंत्रालय

आता आमचे नातेवाईकही नावाच्या साधर्म्यावरुन आमच्या गावाची थट्टा करत आहेत, असे स्थानिक रहिवासी राजू त्रिपाठी म्हणाले. जर आम्ही एखाद्या अनोळखीला आम्ही कुठे राहतो, असे सांगितले तर ते हसतात. एका अनोळखी व्यक्तीशी फोनवर बोलताना मी त्याला कोरौनातून बोलत असल्याचे सांगताच त्याने मला तुम्ही अजून जिवंत कसे, असा उलट सवाल केला. 

योगायोगाने कोरौना ८४-कोसी परिक्रमेतील पहिला टप्पा आहे. प्रत्येक वर्षी होळीच्या पहिल्या पंधरवड्यानंतर हजारो लोक या परिक्रमेत सहभागी होतात. एक स्थानिक शेतकरी गोकुळने म्हटले की, गेल्या अनेक दशकांपासून हे गावाचे नाव आहे. पण अचानक आमच्याकडे अशा नजरेने पाहिले जात आहे. 

जगात दीड लाख कोरोनाग्रस्त रुग्ण बरे,८० % जणांना रुग्णालयाची नाही गरज

मिश्रिख तहसीलमध्ये असलेल्या या गावाची लोकसंख्या सुमारे ९००० इतकी आहे. या गावात एक सरकारी प्राथमिक शाळा आणि इतर सुविधाही आहेत. वास्तवात राज्यातील विकसिक गावांपैकी हे एक गाव आहे. गोकुळ म्हणाला की, एकदा लॉकडाऊन संपल्यानंतर, ग्रामस्थ एकत्र येतील आणि सरकारला गावाचे नाव बदलण्याची विनंती करतील. 

मुंबईतील दाट वस्तीचा वरळी कोळीवाडा परिसर पोलिसांकडून सील

कोणत्याही प्रकारे कोरौनाशी घेणेदेणे नाही. कोरोना विषाणूच्या आठवणी दीर्घ कालावधीपर्यंत राहणार आहेत. येणाऱ्या काळात उपहासाऐवजी नाव बदलण्याचा पर्याय चांगला असेल. विशेष म्हणजे कोरौना अजूनही कोरोना विषाणूपासून सुरक्षित आहे.