पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पॅरिसमध्ये पोलिस मुख्यालयात चाकू हल्ला; चार पोलिसांचा मृत्यू

पोलिसांवर हल्ला

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेल्या पोलिस मुख्यालयात गुरुवारी एका व्यक्तीने पोलिसांवर चाकू हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चार पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर पोलिस जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. २० वर्षाचा हल्लेखोर पोलिस मुख्यालयामध्येच कार्यरत होता अशी माहिती समोर येत आहे. या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्ल्खोराला ठार केले. या घटनेनंतर पोलिस मुख्यालयाला घेराव घालण्यात आला आहे. 

काँग्रेसला माझ्या सेवेची गरज नाही, संजय निरुपम यांची जाहीर नाराजी

या घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिस मुख्यालयाच्या शेजारी असणारे मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहे. तसंच आसपासचा परिसर देखील बंद करण्यात आला आहे. मागच्या महिन्यामध्येच फ्रान्सच्या ल्यून शहरामध्ये अशीच एक घटना घडली होती. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू आणि ८ जण जखमी झाले होते. 

एकनाथ खडसे माझ्या संपर्कात - शरद पवार