पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत काँग्रेस निराशाजनक कामगिरी करणार माहिती होते - संदीप दीक्षित

संदीप दीक्षित

दिल्लीतील निवडणुकीत काँग्रेस निराशाजनक कामगिरी करणार हे मला गेल्यावर्षी सप्टेंबरपासूनच माहिती होते, असे काँग्रेस नेते आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांचे चिरंजीव संदीप दीक्षित यांनी म्हटले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरू आहे. मतमोजणीच्या कलांनुसार तिथे पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचेच सरकार येण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर संदीप दीक्षित यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.

दिल्ली भाजपच्या कार्यालयात लागले सूचक संदेश असलेले पोस्टर

काँग्रेसच्या दिल्ली प्रदेश शाखेमध्ये अनेक त्रुटी आहेत. संघटनात्मक पातळीवर अनेक उणीवा आहेत. दिल्लीमध्ये काँग्रेस संपवण्याला दोन ते तीन नेतेच कारणीभूत आहेत, असा आरोप संदीप दीक्षित यांनी केला. दिल्लीतील काही मोठ्या नेत्यांनी माझ्या आईच्या कार्याचा अपमान केला आहे, असे सांगून ते म्हणाले, दिल्लीतील निकाल एक्झिट पोल्सच्या अंदाजापेक्षा वेगळा येतील, असे मला वाटत नाही. निकाल तसाच लागला तर दोन-तीन नेत्यांपेक्षा इतर कोणालाही दोष देण्यात काहीच अर्थ नाही.

CBSE आणि ICSE शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यासाठी कायदा

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पत्नी आणि खासदार प्रणित कौर यांनीही दिल्लीमध्ये काँग्रेसला यश मिळणार नसल्याचे भाकीत आधीच केले होते. दिल्लीमध्ये गेल्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत आपने ६७ तर भाजपने ३ जागांवर विजय मिळवला होता.