पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कितने अच्छे है मोदी!, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे सेल्फी ट्विट चर्चेत

स्कॉट मॉरिसन आणि नरेंद्र मोदी

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे एक ट्विट सध्या भारतात एकदम चर्चेत आले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एक सेल्फी ट्विट केला असून, त्यामध्ये 'कितने अच्छे है मोदी' असे वाक्य लिहिले आहे. या फोटोमध्ये स्कॉट मॉरिसन आणि नरेंद्र मोदी हे दोघेही सेल्फीसाठी कॅमेऱ्याकडे बघून हसताना दिसतात.

जी २० शिखर परिषदेसाठी हे दोन्ही नेते सध्या जपानमधील ओसाकामध्ये आहेत. त्यावेळीच स्कॉट मॉरिसन यांनी हा सेल्फी घेतला. ऑस्ट्रेलियामध्ये नव्याने निवडून आलेल्या स्कॉट मॉरिसन यांनी सकाळी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत काही अनौपचारिक चर्चाही केली.

गेल्या महिन्यात स्कॉट मॉरिसन आणि नरेंद्र मोदी यांनी एकमेकांना निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी मिळून काम करण्याचे निश्चित केले होते.