पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'किम जोंग उन जिंवत आणि प्रकृती ठिक'

किम जोंग उन

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किंम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त दक्षिण कोरियानं फेटाळून लावलं आहे. किम जोंग उन जिंवत आहेत आणि त्यांची प्रकृती ठिक असल्याचं दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचे सुरक्षाविषयक सल्लागार सीएनएन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. किम जोंग ऊन हे ठिक आहेत, असं ते रविवारी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, ४ दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या आठवड्यात किम जोंग उन यांची प्रकृती खालावली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. किम जोंग उन यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचे या वाहिनीच्या वृत्तात म्हटले होते. मात्र किम जोंग उन हे ईशान्येला असलेल्या वुन्सानमध्ये १३ एप्रिलपासून राहत आहेत, तिथे कोणत्याही संशयास्पद हालचाली आम्हाला आढळल्या नाहीत असंदेखील दक्षिण कोरियाच्या वरिष्ठ सल्लागारानं सांगितलं.

'ना'पाक डाव; ४५० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत

काही दिवसांपूर्वी किम जोंग उनच्या आजोबांची जयंती होती. उत्तर कोरियासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो मात्र यात किम जोंग उन यांचा सहभाग नव्हता. ११ एप्रिलपासून  किम जोंग उन हे सार्वजनिक ठिकाणी कोणालाही वावरताना दिसले नाहीत.  आम्हाला उत्तर कोरियातून अद्यापतरी कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. किंम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील गेल्याच आठवड्यात फेटाळून लावले होते.