पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मला वाराणसी इतकेच केरळ प्रिय - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रयत्न केले ते आमचे आहेत. पण ज्यांनी आमच्या विजयासाठी प्रयत्न नाही केले ते सुद्धा आमचेच आहेत. केरळमध्ये जरी भाजपला एकही जागा जिंकता आलेली नसली, तरी वाराणसीप्रमाणेच केरळही मला प्रिय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जाहीर सभेत सांगितले. सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपद स्वीकारल्यावर नरेंद्र मोदी शनिवारी केरळच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवायूर येथील श्रीकृष्ण मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर एका जाहीर सभेत त्यांनी केरळमधील भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अरे व्वा! उशिराने का होईना मान्सूनचे केरळमध्ये आगमन

नरेंद्र मोदी म्हणाले, निवडणुकीत आम्ही एकमेकांविरोधात लढलो असलो, तरी त्या आता संपल्या आहेत. आता सरकार संपूर्ण देशवासियांचे प्रतिनिधित्व करीत आहे. देशातील जनतेने आपल्यावर जो विश्वास टाकला, त्याबद्दल त्यांनी देशवासियांचे आभार मानले. देशातील नागरिक हेच माझ्यासाठी दैवत आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

देशातील सर्व नागरिकांचा मी सेवक आहे. देशाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पुढील काळातही आम्ही जिंकू किंवा हारू पण आम्ही देशासाठी काम करीत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशात २०४७ पर्यंत भाजपच सत्तेत राहिल - राम माधव

केरळमध्ये पुन्हा एकदा निपाहचा रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी म्हणाले, राज्यातील नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे. आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात असून, दोन्ही सरकार मिळून या आजाराचा सामना करतील. राज्यातील स्थितीवर केंद्र सरकारचे बारीक लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात आज पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ते श्रीलंका आणि मालदीवला भेट देणार आहेत.